डेंगू प्रकोप समस्येबाबत राष्टवादी आक्रमक गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त मा. अशोक पाटील यांना निवेदन

डेंगु प्रकोप समस्येबाबत राष्टवादी आक्रमक गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त मा. अशोक पाटील यांना निवेदन

  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व मनपा गट नेते दुनेश्वर पेठे  यांच्या निर्देशानुसार मध्य नागपुरचे विभागीय अध्यक्ष रिज़वान अंसारी यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री. अशोक पाटील व सतरंजीपुरा झोनचे सहआयुक्त श्री. घनश्याम पंधरे यांना डेंगु प्रकोप या बाबत निवेदन सादर करण्यात आल. शहरात सध्या डेंगु आजाराचा प्रकोप सुरु आहे. मनपा च्या ढिसाळ कारभारामुळे, कोणत्याही प्रकारची तयारी नाही व मनपाच्या अक्ष्यम कामचुकारीमुळे दिवसेंदिवस हा डेंगु शहरातील लोकांना आपल्या विळख्यात घेत आहे. केवळ मनपा व्दारे उपदेश व सुचना प्रदर्शीत करुन डेंगु आटोक्यात येणार नाही यासाठी मनपा ने झोन प्रमाणे योजना तयार करने जरुरी आहे.

      मध्य नागपुर गांधीबाग व सतरंजीपुरा या झोन मध्ये कर्नलबाग, रमाजी की वाडी, सरस्वती स्कूल जवळ, काशी बाई देवल, गंजीपेठ, काजीपुरा, शौकत अली चौक, मुहम्मद अली चौक, लोहारपुरा, शब्बनी कलब, लोधीपुरा, नायापुरा, सफदर का बाडा, बुद्दू खाँ का मिनारा, चंद्रलोक बिल्डिंग, हंसापुरी, गांजाखेत, नालसाहेब चौक, टिमकी, मोमिनपुरा, अंसार नगर, सैफी नगर, किदवाई रोड, मुस्लिम ग्राऊंड, भांगखेडा, हैद्री रोड, तकिया महबुब शाह, जामा मस्जिद चे मागे, डोबी, बोरियापुरा, तकिया मासुम शाह, महाल, भुतिया दरवाजा, जुनी मंगलवारी, तुलसीबाग, भारतमाता चौक परिसर, तबला मार्केट, पाठराबे मोहल्ला, बंगालीपंजा परिसर, लेंडी तलाव झोपडपट्टी परिसर, उमाठे वाडी, मस्कासाथ परिसर, शोभाखेत, गोंडपुरा, बारसेनगर, स्वीपर कॉलोनी, कोलकत्ता रेल्वे लाईन झोपडपट्टी, नंदगिरी रोड लाडपुरा परिसर, तांडापेठ नवी वस्ती, राधेश्याम शाळा परिसर, आदर्श विणकर कॉलोनी परिसर, बापु बनसोड चौक येथील पूर्ण झोपडपट्टी परिसर, हेडाऊ पेंटर चौक, मोचीपुरा कोलकत्ता रेल्वे लाईन, सतरा झोपडे परिसर, चंद्रभागा नगर येथील पुर्ण परिसर, बैरागीपुरा पुर्ण परिसर, नाईक तलाव परिसर, छत्तीसगडी राम मंदिर परिसर, गिरमाजी सावजी परिसर, मराठा चौक येथील पूर्ण झोपडपट्टी परिसर, हनुमान मंदिर गराउंड, बांगलादेश येथील आजू बाजु चा परिसर या भागात डेंगुमुळे भयानक परिस्थीती निर्माण झालेली आहे.

याकरीता त्वरीत खालील उपाय योजना करण्याची मागणी राकांपा व्दारा करण्यात आली.
1) त्या विभागात प्रत्येक गल्लीत दररोज फॉगींग मशीन व्दारे फवारणी करावी व विशेषताः साचलेल्या पाण्यात फवारणी करावी.
2) घरोघरी जाऊन याबाबत जागरुकता पाहणी अभियान सुरु करावे.
3) रुग्णाना मोफत उपचार द्यावे, झोन प्रमाणे व केंद्रीय हेल्प लाईन नंबर जाहीर करावेत व झोन वाईज अॅम्बुलंस व्यवस्था करावी.
4) दगावलेल्या रुग्णांना तातडीने 5 लाखाची मदत जाहीर करावी.
5) करोना असो अथवा डेंगु इतर कोणतेही रोग असो, रुग्णाना दवाखाण्यात नेण्या आणण्याची व्यवस्था म.न.पा. ने करावी.

वरील उपाय योजना त्वरीत अंमलात आणावी व संबधीत अधिकाÚयांचा मोबाईल क्रमांक जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राकांपा व्दारे संपुर्ण शहरात तिव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला.

गांधीबाग झोनचे सहआयुक्त अशोक पाटील यांचे वर्तन अत्यंत अव्यवहार्य होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत आणि त्यांचे प्रश्न विचारल्यास त्यांना कार्यालयातून बाहेर पाठवण्याची धमकी दिली. या प्रकारचा वर्तन पदावर अन्याय करण्याच्या श्रेणीत येते.

शिष्टमंडळात रवि पराते, संजय शेवाळे, संजया कटकमवार, अरशद सिद्दीकी, मिलिंद मानापुरे, राजा खान, जावेद खान, इसराईल अंसारी, फहीम खान, मालती मुळे, शाहरूख खान, वसीम लाला, शेख सरफराज, खिजर अंसारी, अशफाक खान, हेमराज पराते, नवाज खान, चंद्रकांत नाईक, सैयद शारिक अली, शाहिद अंसारी, रिशभ लोहार, नसीर खान आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *