नागपुर, कांग्रेस का हर बुथ महिला संघटन करेंगा मजबुत अभियान शुरू

137

नागपुर/ महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ची कार्यकरिणी आढावा बैठक संध्याताई सव्वालाखे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस यांच्या नेतृत्वात घेण्यात आली .प्रमुख पाहुणे नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांनी महिलां पदाधिकारी संघटन कसे मजबुत करून जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होईल या उद्देशाने हर बुथ महिला संघटन करेंगा मजबुत असा आमचा संकल्प आहे.सर्व नेत्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यशोमती ताई ठाकूर माजी मंत्री यांनी सुद्धा महिला पदाधिकारी यांना संघटन मजबुत करण्या करीता मार्गदर्शन केले. संध्याताई सव्वालाखे प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस यांनी सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हा तालुका अध्यक्ष,यांची आढावा बैठक घेऊन काँग्रेस पक्षाचे संघटन कसे मजबुत होईल असे मोलाचे मार्गदर्शन महिला पदाधिकारी नां केले.तसेच आढावा बैठकीत डॉ वजाहत मिर्झा, आमदार अभिजित वंजारी, अतुल जी लोंढे,विशाल मुत्तेमवार,संजयजी राठोड, उमेश डांगे,देवानंद पवार, उपस्थित होते. नागपूर जिल्हा परिषद च्या उपाध्यक्ष कुंदा ताई राऊत सुद्धा उपस्थित होत्या. सर्व प्रदेश महिला पदाधिकारी, सर्व विभागीय अध्यक्ष, तालुका जिल्हा अध्यक्ष उपस्थित होत्या.तसेच आढावा बैठकीचे सूत्र संचालन सन्माननीय संगीताताई तिवारी उपाध्यक्ष प्रदेश महिला काँग्रेस यांनी केले.