उप जिल्हा रुग्णालय, कामठीमध्ये प्रसूती शस्त्रगृहसाठी 2. 08 कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार,जिल्हाधिकारी व जिल्हाचिकित्सक यांच्या परिश्रमाला यश
कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात, बाळंतपणाची शस्त्रक्रियाद्वारे प्रसूती होणार आहे. आमदार टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी, डॉ. विपीन इटनकर, जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड व वैदयकिय अधीक्षक नयना दुफारे यांच्या प्रयत्नातून शस्त्रक्रियागृह होणार असून,त्यासाठी 2.कोटी 8लक्ष 30 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे
यापूर्वी गरोदर महिलेला प्रसूतीची प्रमाण वाढत असल्यामुळे शस्त्रक्रियागृह, प्रसूती कक्ष लहान असल्यामुळे रुग्णांना कठीण परीस्थीती सामोरे जावे लागत होते वैद्यकीय अधीक्षक डॉ.नयना दुफारे यांच्या बाब निर्दशनात आली. डॉ.नयना दुफारे यांनी आमदार टेकचंद सावकार व जिल्हा शल्यचिकीत्सक यांना कळविले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी. राठोड यांनी हा मुद्दा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर समोर मांडला. जिल्हाधिकारी आणि जिल्हाशल्य चिकीत्सक यांनी शस्त्रक्रियागृहसाठी कामठी उपजिल्हा रुग्णलयाची भेट दिली. शस्त्रक्रियागृहसाठी आमदार,जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आमदार टेकचंद सावकार यांनी जिल्याचे पालक मंत्री मा. देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे आग्रह धरला.राष्ट्रीय आरोग्य अभियानातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना,जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठीतील मुबलक प्रमाणात प्रसूती शस्त्रक्रिया करण्याकरिता रुग्णांच्या सोयीस्कररित्या सेवा देण्याकरिता नवीन प्रसूती शस्त्रक्रियागृहसाठी 2कोटी 08 लक्ष 30हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले लवकर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार सावकार यांनी दिली.आमदार टेकचंद सावकार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हाशल्य चिकित्सक,डॉ.एन.बी राठोड वैद्यकीय अधीक्षक डॉ.नयना दुफारे यांच्या कामाला यश आले..