नागपूर, दहेगाव, कामठी येथील विविध महिला संघटना आणि महिला स्वयंसेवी संघटनांनी मिळून संविधान मंचाचे गठन केले आहे. मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम शुक्रवारी तलाव, सुभाष मार्ग, रमन विज्ञान केंद्राजवळील गुरुदेव सेवा मंडळ भवनात पार पडला. जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभाग आणि २५ विविध महिला संघटना व एनजीओच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
या संघटनांमध्ये जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, यादव महिला मंडळ, सत्यशोधक महिला महासंघ, महिला ग्राम संघ दहेगांव, रूबी वेलफेयर सोसायटी, जागतिक बहूउद्देशीय संस्था, आवाज फाउंडेशन, बामसेफ महिला विभाग कामठी, इंडियन आंबेडकराईट वूमेन फोरम, विदर्भ लेडी लाइट असोसिएशन, नवनिर्माण महिला संघटन, आॅल इंडिया मुस्लिम वूमेन असोसिएशन, बिनतुल मुस्लिम काउंसिल, बौद्ध बहुउद्देशीय महिला संस्था, जमाअ़त ए इस्लामी हिंद महिला विभागाचा समावेश आहे. संस्थांच्या पदाधिका-यांमध्ये प्रेमलता जाधव, रंजना अरविंद सरोदे, छायादेवी यादव, मंजूषा गजभिए, सरोज आगलावे, रुबीना पटेल, सरोज डांगे, नंदा माणिक भगत आणि डॉ. सबिहा खान यांनी आपले विचार व्यक्त केले. द्वेषाची भावना, विविध अमानवीय कुसंस्कार, कुसंस्कृतीने समाजाला आपल्या कवेत घेतले आहे. प्रेम व करुणेच्या वातावरणाने या समस्येपासून सुटका संभव आहे. यामुळे समाजात व देशात स्वच्छ, संस्कारी समाजाची निर्मिती होऊ शकते. उपस्थित संघटनांनी याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचा व एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प केला. सर्व संघटनांच्या सहमतीने डॉ. सबिहा खान यांना सद्भावना मंचच्या अध्यक्षा, डॉ. सरोज आगलावे आणि सुजाता बोंगडे यांना सचीव म्हणून नियुक्त करण्यात आले. मंचच्या इतर सदस्यांची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. बेनझीर खान यांनी सद्भावना मंचचे उद्देश सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन शबाना शेख यांनी केले. त्यांनी पवित्र कुरआनच्या पाठाचे मराठीत अनुवाद केले.