तंबाखू मुक्ती केंद्राचे उद्घाटन व जागतीक योग दिन उप जिल्हा रुणालय, कामठी येथे साजरा करण्यात आला.
आज दिनांक 21/06/2023 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्ती केंद्रांचे उदघाटन जागतिक योग दिनाचे औचित्य साधून उप जिल्हा रुग्णालय, कामठी ,नागपूर येथे डॉ. एन. बी. राठोड जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर यांचे प्रमुख उपस्थितीत मा. वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुगणालय,कामठी डॉ.एन. धुमाळे यांच्या अध्यक्षेतेखाली करण्यात आले.
सदर कार्यक्रमांतर्गत मा. डॉ. एन. बी. राठोड सर जिल्हा शल्यचिकित्सक नागपूर यांनी तंबाखू दुष्परिणाम तसेच तंबखू नियंत्रण कार्यक्रमांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच योग शिक्षक श्री. योगश तुलशान यांनी योगाबाबत सर्वाना मार्गदर्शन करुन प्रत्याक्षिक करुन दाखविण्यात आले. उप जिल्हा रुग्णालय, कामठी येथे तंबाखू मुक्ती केंद्रामध्ये ज्या लोकांना तंबाखू, बिडी, सिगारेट, चे सेवन सोडायचे असल्यास समुपदेशानाव्दारे मदत घेऊन सोडावे, असे आवाहन मा. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राठोड यांनी केले.
तंबाखू मुक्ती केंद्रामध्ये कार्बन मोनोक्साईड मिटर उपलब्ध करण्यात आले आहे. सदर तंबाखू मुक्ती केंद्रा करीता CSR मधून बजाज इलेक्ट्रीकल यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे अनुंषगाने उप जिल्हा रुग्णालय, कामठी येथील डॉक्टर चंमू यांनी तंबाखू विषयी पथनाटय सादरणीकरण अत्यंत उष्कृष्टरित्या केले. कार्यक्रमांचे प्रस्तावीक जिल्हा मौखीक आरोग्य अधिकारी डॉ. दानिश इकबाल यांनी केले तसेच सदर कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी डॉ. विनोद पाकधुने, डॉ. डांगोरे, डॉ. अमितकुमार धमगाये, डॉ. स्वाती फुलसंगे, तसेच उप जिल्हा रुग्णालय, येथील व NCD कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.